…आणि बोलता बोलता तुकाराम मुंढे म्हणाले, ‘माझे काय करायचे हे ठाकरे सरकार ठरवेल !’

CM Uddhav Thackeray - Tukaram Mundhe

नागपूर : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या बदलीचे आदेश अवघ्या १५ दिवसांत रद्द झाले आहेत. तुकाराम मुंढेंचं व्यक्तिमत्त्व अनेकांना आकर्षित करून घेणारं आहे. ते जेथे जातात तेथे त्यांचे फॅन्स आहेत. नागपुरातही (Nagpur) अनेक पत्रकार त्यांचे फॅन्स आहेत. तुकाराम मुंढे लोकांत मिसळणारे आहेत. कोरोनातून (Corona) मुक्त होताच त्यांनी सामान्य नागरिकांची काल भेटदेखील घेतली. तर, आज पत्रकारांना त्यांनी चहापानासाठी बोलावले होते. त्याच वेळी त्यांना बदलीचे आदेश रद्द होण्याची माहिती मिळाली.

पत्रकारांनीही त्यांना बदलीच्या आदेशाबाबत विचारले तेव्हा त्यांनी हसत हसत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व सहज बोलता बोलता ‘माझे काय करायचे हे ठाकरे सरकार ठरवेल’ असे मुंढे बोलून गेले अन पुढे बोलण्याचा विषय बदलला.

तुकाराम मुंढे यांनी नागपुरात सुरुवातीला कोरोनाच्या स्तितीवर ब-यापैकी नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले होते. मात्र कर्तव्य बजावताना त्यांनाही कोरोनाची लागण झाली. परंतु, प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी कोरोनावर मात केली आहे, असे तुकाराम मुंढे यांनी ट्विटरद्वारे सांगितले आणि मुंढेंच्या चाहत्यांना आनंद झाला.

कोरोनाचा अनुभव तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना सांगितला. तुकाराम मुंढेंचा अहवाल २४ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता.

ते म्हणाले, शासनाच्या दिशानिर्देशानुसार नियमांचे पालन करत आयसोलेशन पिरियड सुरू झाला. चाचणीचा निकाल आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनावर मात करताच राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश रद्द केले आहे. त्यामुळे आता त्यांचे पोस्टिंग कुठे होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER