…आणि वर्षा राऊतांना हरवलेल्या दागिन्यांची बॅग मिळाली

…आणि वर्षा राऊतांना हरवलेल्या दागिन्यांची बॅग मिळाली

मुंबई : मुंबईची लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे असे तिला उगाच नाही म्हटले जात. याचे अनेक दाखले आतापर्यंत मिळाले आहेत. नव्या बाळाच्या जन्मापासून ते मध्यरात्रीही एकट्या महिलेला सुरक्षीत तिच्या स्थळी पोहचवण्याचे काम ही लोकल नित्यनेमाने प्रामाणिकपमे करते. आता तर चक्क एका महिलेची सोन्याची बॅगदेखील या लोकलने मिळवून दिली आहे.

हा अनुभव आला आहे कल्याणमध्ये राहणा-या वर्षा राऊत (Varsha Raut) या महिलेला. वर्षा राऊत एका लग्न समारंभासाठी ठाण्याला गेली होती. लग्न समारंभ आटपून वर्षा राऊत यांनी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ठाणेहून लोकल पकडली. कल्याण स्टेशन बाहेर येताच वर्षा राऊत यांना आठवण आली की त्यांची दागिन्यांनी बॅग लोकलमध्येच राहिली. घाबरलेल्या वर्षा राऊत यांनी ही माहिती कल्याण आरपीएफच्या 182 या हेल्प लाईन नंबरवर फोन करुन सांगितली. ही माहिती मिळताच डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव यांनी पुढील प्रकिया सुरू केली.

वर्षा राऊत ज्या लोकलने आल्या होत्या ती लोकल ठाकुर्ली स्थानकावर सायडींगला उभी केली होती. वर्षा या शेवटच्या महिला डब्ब्यात बसल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच आरपीएफ उपनिरीक्षक आदेश कुमार प्रधान, आरपीएफ एम.बी. हिवाळे आणि किशोर येळने यांनी ठाकुर्ली स्थानकात जाऊन पिवळ्या रंगाची बॅग शोधून काढली. शोधलेली बॅग मिळाली आहे ही माहिती मिळताच वर्षा राऊतांना आनंद गगनात मावण्याजोगा नव्हता. अशाप्रकारे डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफूल सिंग यादव यांनी वर्षा राऊत यांचे 6 लाखांचे दागिने परत केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER