आणि अशा तऱ्हेने अजय देवगण नायक झाला

Ajay Devgan

अजय देवगनचे वडिल वीरू देवगण (Viru Devgan) बॉलिवुडमधील प्रख्यात स्टंट डायरेक्टर म्हणून ओळखले जात असत. बॉलिवुड चित्रपटातील स्टंटमध्ये त्यांनी हॉलिवुडचा तडका देण्याचा प्रयत्न केला होता. ते नेहमी वेगवेगळ्या कल्पना स्टंटमध्ये उतरवत असत. त्यांनी कोरियोग्राफ केलेली ऍक्शन दृश्ये चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असत. मात्र फार कमी जणांना ठाऊक आहे की वीरु देवगण बॉलिवुडमध्ये नायक बनण्यासाठी आले होते. 1957 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी  वीरू देवगण अमृतसरहून पऴून मुंबईला आले होते.

विनातिकिट रेल्वेत बसलेल्या वीरु देवगण यांना त्यांच्या मित्रांसहित टीसीने पकडले आणि दंडाची रक्कम नसल्याने सात दिवस तुरुंगात राहावे लागले होेते. त्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांनी टॅक्सी धुण्यापासून सुतारकाम करण्यापर्यंत सगळी कामे केली. थोडा पैसा आल्यावर त्यांनी नायक बनण्यासाठी स्टुडियोच्या चकरा मारण्यास सुुरुवात केली. परंतु त्यांना लवकरच समजले की त्यांचा चेहरा नायक होण्यास योग्य नाही आणि ते दुसरी कामे करू लागले. मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलाला एक दिवस नायक बनवणारच असे स्वप्न पाहिले. त्यामुळेच अजय देवगणला (Ajay Devgan) लहानपणापासून ते स्टुडियोत नेत आणि फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अजय कॉलेजला गेला तेव्हा त्याला डांस क्लासला घातले. घरात जीम तयार केले, अजयला उर्दूची शिकवणी लावली आणि हॉर्स रायडिंगही शिकवले.

कॉलेजमध्ये असतानाच अजय देवगन शेखर कपूरच्या दुश्मनी चित्रपटात त्यांना सहाय्यक म्हणूनही पार्ट टाईम काम करू लागला होता. अशा तऱ्हेने अजयचे एका नायकाला आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण जवळ-जवळ पूण झाले होते. एक दिवस अजय घरी आला तेव्हा कुकू कोहली आणि त्याचे वडिल चर्चा करताना त्याला दिसले.

वीरू देवगणनी अजयला बोलावले आणि कुकू कोहली फूल और कांटे चित्रपट बनवत असून तू त्यात नायकाची भूमिका करीत आहेस असे सांगितले, तेव्हा अजयने म्हटले, काहीही काय सांगता,  मी अजून लहान असून हीरो बनण्याचा विचार केला नाही. मात्र वीरू देवगणनी त्याला समजावले आणि 1990 च्या नोव्हेंबरमध्ये फूल और कांटेच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि बॉलिवुडला अजयच्या रुपाने नवा नायक मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER