या कारणांमुळे आमचा पंढरपुरात पराभव, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

Jayant Patil-Maharashtra Today

मुंबई : प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा (Pandharpur-Mangalvedha Assembly) मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jaytant Patil)यांनीस्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यांतील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button