‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू!’ वीज बिलावरून नितेश राणेंची बोचरी टीका

Nitesh Rane

मुंबई :- लॉकडाऊन काळातील वीज बिलात (Electricity bill) काहीही सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ही संधी साधून भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) नाईट लाईफची कल्पना, पेंग्विन याचे मिश्रण करून आदित्य ठाकरे यांना  टोमणा मारणारे अतिशय बोचरे ट्विट केले आहे.

नितेश राणे यांचे ट्विट –

या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे असे  दिसते. वीज बिल इतके हातात दिले की, कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार…  आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरु!!!

सध्या हे ट्विट जबरदस्त व्हायरल होते आहे.

ही बातमी पण वाचा : वीज बिलाबाबत लवकरच निर्णय : अनिल परब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER