… आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही सुरू झाली ; भाजपा नेत्याचे ट्विट

Uddhav Thackeray & Atul Bhatkhalkar

मुंबई : टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रविवारी रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदानी (Vikas Khanchandani) यांना अटक केली.

पोलिसांनी कोणत्याही कागदपत्रांशिवाय खानचंदानी यांना अटक केल्याचे रिपब्लिक टीव्हीकडून सांगितले जात आहे. याच मुद्द्यावर भाजपा नेत्यांकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारची हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका भाजपा (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER