अन् माझ्या डोळ्यात अश्रू तरळले; पंकजा मुंडेंनी सांगितला आजचा अनुभव

Pankaja Munde

मुंबई :- माझ्या देशातील शेतकरी विकसित होत आहेत, आज देशातील 9 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका क्षणात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यावेळी, स्क्रीनवर आकडे स्क्रोल होत होते, त्यावेळी मला अभिमान वाटत होता, त्याक्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले होते, असे ट्विट भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) केले आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांना पैसे नको; न्याय हवा आहे; सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता पाठविला. याअंतर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात एकूण १८ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. मोदींनी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी मोदींच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. विरोधी पक्षनेत्यांसह मोठे भाजपा नेते या कार्यक्रमाला हजर होते. पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या कार्यक्रमासंदर्भातील आठवण सांगितली.

दरम्यान पंकजा यांनी आजच्या व्हर्च्युअल कार्यक्रमास हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER