आणि… सुप्रिया सुळेंना बांगड्या भरण्याचा मोह आवरता आला नाही…

पुणे :  असं म्हणतात, बांगड्या – कुंकू हे एका स्त्रीचं, माहेरवाशीणीचं सौभाग्यचं लेणं आहे. आणि मग एकाकी ते डोळ्यासमोर दिसलं की त्याचा मोह देखील आवरता येत नाही. असाच एक सुखद प्रसंग घडलाय खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत.

राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदाराच्या भेटीला निघाल्या. दरम्यान, बांगड्यांचा स्टॉल पाहून त्यांना बांगड्या भरण्याचा मोह आवरता आला नाही.

बारामती मतदारसंघातील शेळगाव येथे आज त्यांचा दौरा होता. तेथील पदयात्रेत बांगड्यांचा स्टॉल दिसला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी तेथे बसून बांगड्या भरल्या. विशेष म्हणजे बांगड्या भरणाऱ्या काकुंचेही माहेर बारामती असल्याचे लक्षात आले. अवघ्या दोन मिनिटांत दोघी माहेरवाशिनींच्या गप्पा रंगल्या.

ही बातमी पण वाचा : …तर घरात घुसून मारणार; सुप्रिया सुळेंची शेवाळेंना धमकी