… आणि अचानक एक पार्सल आलं !

and suddenly a parcel arrived

पूर्वी मुलांच्या लहानपणी, ख्रिसमसच्या दिवशी रात्री एक मोजा बाहेर लटकवून ठेवायचा आणि रात्री सांताक्लॉज येवून त्या मध्ये मुलांना आवडती वस्तू ठेवून जात असे. ( अर्थात मुलांच्या आवडीची वस्तू आम्हीच ठेवायचो. ) मुलं खूप उत्सुकतेने सकाळी उठल्याबरोबर ती वस्तू पाहिला जात असतं. जसजशी ती मोठी झाली, समजू लागले तसा हा निखळ आनंद हरवला. पण अशीच एक स्थिती मागच्या वर्षी म्हणजे 2020 या वर्षी झाली. साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये असंच एक पार्सल भारतात आले. आणि पार्सल म्हटल्यानंतर फारच उत्सुकतेने ते उघडूनही पाहण्यात आल. आणि काय म्हणता ! त्याचे परिणाम आज पर्यंत आपण फेस करतोय. पार्सल चे नाव होतं covid-19.नेहमीच्या पार्सल सारखं नव्हत ते ! त्याचे परिणाम ,अमीर गरीब ,लहान-मोठे, स्त्री-पुरुष सगळे देश, आजही त्याचे परिणाम भोगत आहेत.

मनुष्य स्वभावाप्रमाणे अजूनही चिवट अशा आशेने त्यावर संशोधन सुरू आहे. नेमकं काय आहे हे covid-19 ? कसं स्वरूप बदलते ? लक्षणं कशी बदलतात आणि त्याच्यावर इलाज काय ? यातूनच लसीचा शोध लागला.असं काय काय घडत आहे ,आजही ब्राझील युएस मध्ये पहिली दुसरी ,तिसरी लाट येतेच आहे.

काय परिणाम झाले आणि होतात आहे या कोविदचे ! तसं म्हणाल तर हे परिणाम सांगायची गरज नाही कारण आपण ते भोगतोच आहोत. महिनोन् महिने घरात बसून , आता आपल्याला रस्त्याने चालता येईल की नाही ? अशीसुद्धा शंका निर्माण होते. गाडी चालवता येईल की नाही हाही प्रश्नच आहे. कारण गरज पडत नसेल तर घराबाहेर कोण पडेल ? वॉक पण घरातल्या गुळगुळीत फरशीवर नाही तर गच्चीवर, जास्तीत जास्त अंगणात ! कधी ना कधी हा कोविड संपेलच. परंतु असे दीर्घकालीन इफेक्ट एक वर्षानंतर जाणवत राहणार आहे. त्यात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम भोगावे लागणार आहेत. यापैकी पेशंटच्या बाबतीमध्ये एक नवीन अभ्यास पुढे आला , त्याप्रमाणे न्यूरो सायकियाट्रिक लक्षणे म्हणजे इतर आजारांपेक्षा नवीन अशा मानसिक आजारांची लक्षणे 90 दिवसात जाणवण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे असे म्हटले आहे. अर्थात ही विशेषतः आयसीयू पेशंट्स मध्ये जाणवण्याची शक्यता आहे. यामध्ये 22% चिंता, काळजी आणि 38 टक्के नैराश्य यांची दिसण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे इतर शक्यता म्हणजे कनफुयजन, विचारांचा गोंधळ, इसोमनिया ,मेमरी कमी होणे, एकाग्रचित्तचा अभाव, आणि पोस्टट्रोमँटिक स्ट्रेस , यांचा समावेश दिसेल.

त्याचप्रमाणे जे हेल्थकेअर पुरवणारे लोक आहे विशेषतः हा धोकादायक स्थितीतील पेशंटसाठी जे मदत पुरवतात, किमान त्यांचा डायरेक्ट पेशंटची खूप संपर्क असून, कोरनटाइन पेशंट सोबत राहणे होते, आणि अपुरी अशी काळजी घेतली जाते, ज्यांना लोकांच्या, सामाजिक समाजातील भीतीशी सामना करावा लागतो. अशांमध्ये सुद्धा आता नैराश्य ,भीती ,चिंता ,काळजी आणि झोपेचा अभाव यांची तीव्रता जाणवते.

हे कमी करण्यासाठी नियमित एक्झरसाइज, सायकोथेरपी सेशन घेणे, मेडिटेशन चा सराव, याबरोबरच आपल्या कलिग्ज आणि सपोर्ट ग्रुप सोबत शेअर करणे, बोलणे, मन मोकळे करणे हे उपाय करता येतात.

असेच परिणाम लहान मुलांवर ही झालेले जाणवतात. कारण त्यांचा रुटीन डिस्टर्ब झालेला आहे, शाळा बंद आहेत, ते आपल्या मित्रांना भेटू शकत नाही, नवीन काही करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम देखील वाढलेला आहे. अगदी छोटी जी बाळ किंवा मुलं आहेत, त्यांना तर धड हे नेमकं काय चालू आहे ? हेच पुरेसं नीट कळत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये समायोजन आणि संवाद कौशल्य पुरेसे निर्माण करता येऊ शकत नाही. आणि परिणामत: त्यांच्या वर्तनाचा, चिडचिडेपणाचा, विकासातील टप्प्यांचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यांचे चित्त एकाग्र करण्याचा वेळ अतिशय कमी होतो आहे. यावर इलाज म्हणून पालकांनी जास्तीत जास्त वेळ त्यांना देणे, प्रेम देणे माया देणे, मीडियापासून जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढे दूर ठेवून आजूबाजूच्या मुलांबरोबर त्याचबरोबर नातेवाईकांबरोबर व्हिडिओ चॅट करणे. हे करता येऊ शकते.

पौगंडावस्थेतील मुलांचा पण खूप प्रश्न आहे कारण त्यांना नवीन काही अनुभव घेण्याची इच्छा असते. शिकण्याची इच्छा असते .त्यामुळे ते आपल्या मित्रमंडळींसोबत बोलायला ,चर्चा करायला उत्सुक असतात. पण आता यावरच गदा आल्यामुळे ते बोअर ,निराश , एकाकी होत आहेत. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची वर्ष, त्यांचा कॉलेज लाईफ ,हाही एक निश्चितच चांगला अनुभव असतो ते वाया जात आहे.

एकूण इतर सगळेच लोक तितकेच होरपळले आहे कारण, बऱ्याच जणांना आर्थिक फटका बसलेला आहे, दररोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, घरी नातेवाइकांमध्ये जर आजारपण आलं तर अतिशय जास्त मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ऑक्सिजन मिळेल की नाही? बेड मिळेल की नाही? आपला माणूस नीट बरा होईल की नाही? यासारख्या अनिश्चिततेच्या फेऱ्यात सगळी जनता फिरते आहे.

फ्रेंड्स ,अशा या स्थितीमध्ये, सरकार किंवा नेते यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. कारण शेवटी सामान्य माणसाची ही लढाई आहे. आणि ती आपणच लढायची आहे.

वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम झालेला असल्यामुळे आता त्या बाबतची तयारीसुद्धा ग्लोबल लेव्हल वर व्हायला हवी. आणि म्हणूनच आपण पहिली स्टेप उचलली ती म्हणजे

१) इन्व्हेस्टिगेशन ! आपण लस कशी तयार करायची ? या आजारावर काय उपाय असू शकेल याचा शोध घेण्याचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करण्यात आला. आणि सुदैवाने प्रयोगाला यश येऊन आज vaccine उपलब्ध आहे. हळूहळू याची गती वाढवायला हवी. लशीचे उत्पादन वाढायला हवे, आणि अफवांना बाजूला सारून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि वॅक्सिंन कसे पोहोचता येईल , यात आपल्या प्रत्येकाचा वाटा असायला हवा.

त्यानंतर आपल्या जवळ असणारे २) रिसोर्सेस :–, फंडस्,जमिन, इलेक्ट्रिसिटी, खाजगी सरकारी सहकारी संस्था यांची मदत कशी घेता येईल?याचा विचार करू.

३) quantity :– कुठल्या रिसोर्सेस आपल्या जवळ आहे? कुठले बाहेरून आणायचे ? किती प्रमाणात आणायचे? आणि ते कुठे वापरायचे ? स्टॉक कुठे करायचा ? यासंबंधी विचार करावा लागेल.

४) आपले उद्योगधंदे वाढवण्यासाठी वेळोवेळी ज्याच्यात बदल होतो असे गव्हर्मेंट चे नियम याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे बाजार कसा फ्ल्युक्च्युएट होतो , खाली वर जातो यावरही लक्ष द्यावे लागेल.

५) टाईम अँड हेल्थ मॅनेजमेंट/फिटनेस मॅनेजमेंट हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन पुढच्या हालचाली कराव्या लागतील.

६) SWOT ऍनॅलिसिस या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करावा लागेल. कारण यानंतर पूर्ण बिझनेसचे ट्रेडस् बदलणार आहेत. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये असणारी संधी आणि आणि त्याबरोबरच covid किती काळ चालेल हे माहीत नसल्यामुळे आपल्या व्यवसायाला तसे स्वरूप द्यावा लागेल. उदाहरणार्थ सध्याच्या काळामध्ये लग्न किंवा फंक्शन फारसे नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य घेतले जाणार नाही अशा वेळेला फार मोठा स्टॉक करून ठेवून उपयोगाचा नाही .त्याच प्रमाणे संधी कुठली तर या काळामध्ये लोकांना मध्ये तब्येतीची काळजी घेण्याचे प्रमाण अत्यंत वाढलेले आहे .त्यामुळे त्या तब्येती संबंधी जी पण काही चांगली उत्पादने बाजारात आणता येतील, ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले भाजीपाला, फळे आणि इतर वस्तू आणता येतील त्याला अर्थातच मागणी राहील या संधींचा आणि अडथळ्यांचा विचार करावा लागेल.

७) पुढच्या काही वर्षांमध्ये कुठल्या बिजनेस ना चांगला वाव आहे, इमर्जिंग सेक्टर कुठले ? तर लॉजिस्टिक, हेल्थ केअर, कन्स्ट्रक्शन (विशेष करून इको-फ्रेंडली) ऑटोमोबाईल यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या कार, टुरिझम यामध्ये लोक आता देशाच्या बाहेर जाण्या पेक्षा, कमी वेळ कमी पैसा लागेल असा देशातल्या देशात प्रवास करण्यावर भर देतील.

म्हणजेच आपल्याला इन्वेस्टीगेशन हे अनेक पातळींवर करावे लागेल, दूरदृष्टीने खूप पुढच्या गोष्टी आढावा घेऊन, दोन पावले पुढे जाऊन विचार करायला लागेलं.

फ्रेंड्स ! तुम्ही विचार केला की तुम्हालाही बऱ्याच गोष्टी सुचतील. त्यासाठी हा केलेला मी केवळ एक प्रयत्न यातून तुम्हाला त्या दिशेने विचाराला प्रवृत्त व्हाल किंवा मोटिवेशन मिळेल. तुमच्या कल्पना नक्की कळवा.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button