…आणि काही वेळातच आदित्य ठाकरेंनी डिलीट केले मोफत लसीकरणाचे ट्विट!

Aaditya Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोना प्रतिबंध लसीकरणावर भर देण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. अनेक राज्यांनी सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी १ मेपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राज्यात कोरोनाची लस मोफत दिली जाणार अशीच घोषणाच करून टाकली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केले आहे.

बिहार, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कधी मोफत लसीकरणाची घोषणा करणार असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा ट्विटच्या माध्यमातून करून टाकली. पण, काही वेळांनी आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरण केल्याचे ट्वीट डिलीट केले. ‘राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे’ असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंना द्यावे लागले. तसंच. ‘लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे जाहीर करण्यात येईल आणि समाजातील सर्व घटकांसाठी योग्य धोरणाच्या शिफारशीची आपण प्रतीक्षा केली पाहिजे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button