…आणि आभार व्यक्त करत मनसैनिकांच्या तोंडून निघाले, ‘गडकरी नावाचा देवमाणूस’

Maharashtra Today

नागपूर : संकटकाळी राजकीय वैर सोडून मदतीला धावून जाणारे मोठे राजकारणी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ओळखले जाते. विदर्भात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला असून, खुद्द नितीन गडकरी (Nitin Gadkari) कोरोनाविरोधातील लढ्यात उतरले आहेत. विदर्भात वैद्यकीय सुविधा पुरवण्यात त्यांनी लक्ष घातलेले आहे. मात्र ही मदत पुरवताना त्यांनी कुठलाही दुजाभाव दिसू दिला नाही. याचा प्रत्येय विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याना आला.

मनसेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांनी काल सायंकाळी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांना फोन केला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये डॉ राहुल नरोडी यांचे चांगले हॉस्पिटल असून, सध्या कोविड रुग्णांसाठी १० बेड उपलब्ध आहेत, त्यांना किमान अजून २५
बेडची परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे. मात्र जिल्हा प्रशासन परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपण केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी साहेबांशी याबाबत बोला अशी विनंती केली. त्यानुसार अतुल वांदिले व हिंगणघाट येथील मान्यवर डॉक्टर आणि हेमंत गडकरी यांनी नितिन गडकरी यांची भेट घेतली.

या सर्वानी ही बाबा गडकरी यांना सांगितली. गडकरी यांनी कुठलाही वेळ न लावता थेट वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून २५ बेडची परवानगी मिळवून दिली. तसेच तुमच्याकडे सध्या किती व्हेंटिलेटर आहेत, अशी विचारणा डॉ.नरोडी यांना केली. डॉ नरोडी यांनी २ व्हेंटिलेटर असल्याची माहिती दिली. त्यावर गडकरी यांनी अजून मी २ व्हेंटिलेटर देतो हेमंत ताबडतोब घेऊन जा व रुग्णसेवेसाठी कामात आणा असे सांगितले. हे ऐकताच उपस्थित सर्व अवाक झाले, आम्ही बेड वाढवून घेण्यासाठी आलो ते काम तर झालेच पण सद्या दुर्मिळ पण अत्यावश्यक बाब असलेले २ व्हेंटिलेटर व इतर साहित्य (अंदाजे किंमत २५ लाख) हे मिळाल्याबद्दल हिंगणघाट येथील डॉक्टरांनी गडकरींचे मनापासून आभार मानले. आजचा दिवस कोविडच्या नकारात्मक वातावरणात राजकारण, पक्षभेद, या संकुचित विचारांना तिलांजली देऊन अजूनही राजकीय क्षेत्रात माणुसकी व महाराष्ट्राची संस्कृती जिवंत आहे याचा प्रत्यय गडकरींनी दाखवून दिला.


 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button