…आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केजरीवालांनी मागितली हात जोडून माफी

Arvind Kejriwal - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona) परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजचा आपला पश्चिम बंगालचा दौरा रद्द करून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले. अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा शब्दांत मोदींनी केजरीवालांना सुनावलं. यानंतर केजरीवाल भांबावून गेले. त्यांना हात जोडून पंतप्रधान मोदींची माफी मागावी लागली.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मला दररोज यासाठी फोन येतात. मी काय करावं? मी कोणाला फोन करावा? असे प्रश्न केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित केले. विशेष म्हणजे केजरीवालांकडून या बैठकीचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. याबद्दल मोदींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही करत असलेली कृती योग्य नाही. अशा स्वरूपाच्या बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं योग्य नाही. आपल्याला कायम संयम ठेवायला हवा.’ असं मोदींनी म्हटलं. यानंतर केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचं म्हटलं. ‘पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो. ’ असं म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडले.

दरम्यान, अरविंद केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील त्यांचा संवाद गुपचूपपणे रेकॉर्ड करत होते. ही बाब पंतप्रधान मोदींच्या लक्षात आली. त्यांनी याबद्दल केजरीवालांना कठोर शब्दांत सुनावलं. त्यावेळी केजरीवालांना काहीसा धक्काच बसला. केजरीवालांनी पंतप्रधानांसोबतचा संवाद केवळ रेकॉर्ड केला नाही. तर तो लीकदेखील केला. यावरून आता भारतीय जनता पक्षानं केजरीवालांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

ही बातमी पण वाचा : ऑक्सिजन टँकर अडवल्यास केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा?; केजरीवाल यांचा पंतप्रधानांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button