… आणि केंद्रातील सत्ता पालटासाठी शेतकरी विरोधी कायदेच बनतील मोठी ढाल!; पवार – सोनिया यांच्या भेटीगाठी, बैठका सुरू

Sonia Gandhi - Sharad Pawar
  • शरद पवार – सोनिया गांधी यांचे लक्ष्य दिल्ली, सरकारला घेरण्यासाठी बैठका, भेटीगाठी सुरू

मुंबई :- कृषी विधेयक कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. महाराष्ट्राचे मोठे नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता आपले लक्ष्य केंद्र सरकारकडे लक्षीत केले आहे. शेती, शेतकरी आणि शरद पवार यांचा सहसंबंध देश जाणतो. त्यामुळे नवीन शेतकरी कायदेच आता पुढील राजकीय यशासाठी पवार सोनीयांसाठी मोठी ढाल बनून ऊभे राहतील का असे सध्याचे चित्र आहे.

नवीन कृषी कायद्यांसाठी आता सर्वोच्च न्यायालयानेही केंद्राला फटकारले आहे. त्यामुळे विरोधकांना आता बळ मिळाले आहे.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी रोजी सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीतील संबोधनानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, कृषी कायद्यांविरोधात सरकारला घेरण्यासाठी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी यांनी सोमवारी एका बैठकीचं आयोजन केलं. विरोधकांच्या बैठकीच्या निमित्तानं मोदी सरकारविरोधात एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी सुरू करण्यात आलीय. या बैठकीत सोनिया यांनी काही विरोधी नेत्यांशी चर्चा केली. काही जणांशी त्या मंगळवारीही संवाद साधणार आहेत.

बळाच्या जोरावर लागू करण्यात आलेले कृषी कायदे तसंच ढासळलेली अर्थव्यवस्था या स्थितीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येणार आहे. काँग्रेससहीत विरोधी पक्षांकडून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली जातेय.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक फोन करून संयुक्त बैठक आयोजित करण्याचा आग्रह करण्यात आलाय. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच सीताराम येचुरी आणि डी राजा या डाव्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतलीय. पवार यांनी या नेत्यांशी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा केली होती.

सोमवारी कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी, ‘आम्हाला आमच्या हातात कुणाचंही रक्त नकोय’ असं म्हणतानाच ‘कृषी कायद्याला केंद्र स्थगिती देणार की आम्ही देऊ’, अशी कडक भूमिका सर्वोच्च न्यायालयानं घेतली. त्यामुळे, विरोधकांना नवं बळ मिळालंय. सर्वोच्च न्यायालय हे कायदे स्थगित करू शकतं, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवारच मोदी सरकारला उखडून फेकतील’, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे मोठे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER