अनन्या पांडेने चोरला होता ब्रिटिश एअरवेजचा नाईट सूट

Ananya Panday - Kareena Kapoor Khan

बॉलिवुड (Bollywood) कलाकार कोट्यावधींची कमाई करीत असले तरी अनेक गोष्टी फुकट मिळाव्यात असे त्यांना वाटत असते. त्यामुळेच अनेक कलाकारांना हॉटेलमधून एखादी वस्तू बॅगेत घेऊन जाताना पकडण्यात आले आहे. मात्र सेलेब्रिटी असल्याने हॉटेल प्रबंधक कलाकारांना सूट देतात. करण जोहरने हॉटेलमधील टॉवेल चोरल्याची माहिती एकदा मुलाखतीत दिली होती. अशी अनेक उदाहरणे असून नव्या पिढीची अनन्या पांडेही याच श्रेणीतील कलाकार म्हणता येईल. अनन्याने (Ananya Panday) हॉटेलमधला नाही पण ब्रिटिश एअरवेजचा (British Airways) नाइट सूट चोरला होता आणि ती अनेक दिवस तो रोज वापरतही होती. स्वतः अनन्यानेच ही कबुली दिली आहे.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ‘व्हॉट वूमन वॉन्ट सीजन 3’ घेऊन प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत करीना कपूर बॉलिवुडमधील कलाकारांना मुलाखतीसाठी बोलावते आणि त्यांना मजेदार प्रश्न विचारते. यावेळच्या एपिसोडमध्ये चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे आली होती. यावेळी करीनाने अनन्याला खूपच वेगळे आणि मजेदार प्रश्न विचारले आणि अनन्यानेही त्याची प्रामाणिकपणे उत्तरे दिली. या दोघींच्या मुलाखतीचा हा व्हीडियो प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. मुलाखतीत करीनाने अनन्याला सतत तिच्या लॉकडाउन लुकबाबत प्रश्न विचारले. यावेळी कपड्यांची माहिती देताना अनन्याने सांगितले की, एकदा तिने ब्रिटिश एयरवेजमधून एक नाइट सूट चोरला होता आणि लॉकडाऊनच्या काळात घरी तो नाईट सूट ती रोज घालायची. एवढेच नव्हे तर वडिल चंकी पांडे यांचे लूज टीशर्ट्सही ती घरी घालत असे.

करीनाने जेव्हा अनन्याला कुकिंग स्किल्सबाबत विचारले असता, अनन्याने, मला जेवण बनवायला बिलकुल येत नाही. त्यामुळे मी किचनमध्ये जातच नाही असे उत्तर दिले. त्यानंतर करीनाने अनन्याला तिच्या फॅशन आयकॉनबाबत विचारले असता अनन्याने करीनाचेच नाव घेतले. अनन्या म्हणाली, जेव्हा मी लग्न करीन तेव्हा करीनाने तिच्या लग्नात मनीष मल्होत्राने बनवलेला पिंक मजेंटा लहंगा घालणे पसंद करीन. तो लेहंगा असेल तरच मी लग्न करेन असेही अनन्या म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER