विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ची नायिका अनन्या पांडे

गेल्या काही महिन्यांपासून साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा एक सिनेमा येणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या सिनेमाचे नाव आणि अन्य बाबी जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. करण जोहर निर्मिती करीत असलेल्या या सिनेमाचे पहिले टीझर पोस्टर सोमवारी सकाळी रिलीज करण्यात आले. विजय आणि अनन्या अभिनीत या सिनेमाचे नाव ‘लायगर’ (Liger) ठेवण्यात आलेले आहे.

सोमवारी सकाळी करण जोहरच्या धर्मा प्रो़डक्शन्स आणि अभिनेता विजय देवरकोंडाने सोशल मीडिया या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज केला. विजय देवरकोंडाने सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करताना ट्विटर वर लिहिले, ‘अत्यंत नम्रपूर्वक पूर्ण भारतात आगमन करत असल्याची घोषणा करीत आहे. पूर्ण देशात वेडेपणाची गॅरंटी आहे,’ या फर्स्ट लुकमध्ये बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेला विजय अत्यंत रागावलेला दिसत असून त्याच्या बॅकग्राऊंडला एका वाघाचा फोटो दिलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन साऊथमधील यशस्वी दिग्दर्शक पुरी जगन्नाथने केले आहे. ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्यासोबत रम्या कृष्णण, रोनित रॉय, विशु रेड्डी यांच्याही भूमिका आहेत. धर्मा प्रोडक्शन्ससोबत पुरी जगन्नाथ, अपूर्व मेहता आणि अभिनेत्री चार्मी कौरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. चार्मी साऊथची यशस्वी अभिनेत्री असून ‘आयस्मार्ट शंकर’नंतर तिचा निर्मात्री म्हणून हा दुसरा सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER