अनन्याने पूर्ण केले ‘लायगर’चे गोव्यातील शूटिंग शेड्यूल

Liger

बॉलिवूडमधील नव्या पिढीची अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या अनेक सिनेमात काम करीत आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी असलेल्या अनन्याने नायिका म्हणून तिने अनेक मोठमोठ्या नायकांसोबत सिनेमे केले आहेत. आता तर अनन्याने साऊथमध्येही धडक मारली आहे. साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत (Vijay Devarakonda) अनन्या ‘लायगर’ नावाच्या सिनेमात काम करीत आहे. या सिनेमाचे गोव्यातील पहिले शूटिंग शेड्यूल तिने नुकतेच पूर्ण केले. शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती तिने सोशल मीडियावर पार्टीचे फोटो टाकून दिली. या सिनेमात विजय देवरकोंडा एका बॉक्सरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात तिने गोव्यातील शूटिंग रॅपअप झाल्याची घोषणा केली आहे. एका फोटोमध्ये ती तिच्या गर्ल्स ग्रुपसोबत जहाजावर बसून एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोसोबत अनन्याने लिहिले आहे ‘दॅट्स रॅपअप फॉर गोवा.’ तर दुसऱ्या फोटोमध्ये ती सिनेमाची टीम आणि कोरियोग्राफरसोबत डिनर करताना दिसत आहे. या फोटोसोबत अनन्याने लिहिले आहे, #लायगर आणि हार्टचा एक इमोजीही सोबत लावला आहे. अनन्यासोबतच कोरियोग्राफर पीयुष भगतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

पॅन इंडिया रिलीज होणारा हा अनन्याचा पहिलाच सिनेमा असल्याने ती खूप आनंदात आहे. हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात रम्या कृष्णन, रोनित रॉय यांच्याही भूमिका असून पुरी जगन्नाध दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER