आनंद महिंद्रांनी टोला लगावल्यानंतरही मानले उद्धव ठाकरेंचे आभार

cm uddhav thackeray - anand mahindra - Maharastra Today
cm uddhav thackeray - anand mahindra - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्याआधी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जाहीरपणे लॉकडाऊनचा इशारा दिला होता. त्यानंतर लॉकडाऊनला (Lockdown) महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) इतर मित्रपक्षांचा तसंच काही उद्योजकांनी विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. मात्र आता महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.

लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या कोरोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरून ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.

दरम्यान महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट करून लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला होता. उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरित मजूर आणि छोट्या उद्योजकांचं होतं. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात , असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button