पावसात भिजणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा व्हीडीओ रिशेअर करून आनंद महिंद्रानी दिला सल्ला …

anand mahindra - Maharashtra Today

कोकण किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून एकाचा जीवही गेला आहे. मुंबईत वादळाचा वेग ताशी ११४ कि. मी. आहे. या वादळात रस्त्याची साफसफाई करणाऱ्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी मुंबई महापालिकेला एक सल्ला दिला – या कर्मचाऱ्यांना रेनकोट दिले कि नाही, याची खात्री करून घ्या.

सोशल मीडियावर लोक या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान किंवा त्याचे फोटो पोस्ट करत आहेत. यापैकीच हा एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ आनंद महिद्रांनी रिशेअर केला आहे. यावर त्यांनी कमेंटही केली – या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी बीएमसीला एक विनंती आहे, सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतु तो त्यांच्याकडे आहे की नाही याची खात्री करून घ्या.

हा व्हिडीओ एक ट्विटर युजर @Aladdin_ka_ ने सोमवारी पोस्ट केला आहे. यावर त्याने लिहिले आहे की, त्यांचा सन्मान करा, असे प्रसंग मला किती अधिकार आहेत याची जाणीव वरून देतात…असे म्हटले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ८४ हजार व्ह्यूवज मिळाले आहेत. १६७१ लाईक्स आणि ३०९ वेळा रिट्विट करण्यात आले आहे. आनंद महिंद्रांच्या रिट्विटला ३. ८ हजार लाईक्स मिळाले आहेत.

Discalimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button