आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेत; आता थेट प्रवक्तेपदी वर्णी

Maharashtra Today

मुंबई : गेल्या दोन वर्षांच्या काळात शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिघा जणांची  शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

सचिन अहिर (Sachin Ahir), प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यासह आनंद दुबे (Anand Dubey) यांनाही प्रवक्तेपदी स्थान मिळाले आहे. दरम्यान २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर, विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या पाच महिन्यांच्या काळात काँग्रेसला चांगलीच गळती लागली होती.

काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे तत्कालीन प्रवक्ते आनंद दुबे यांनीही शिवबंधन बांधले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुबेंनीही आपल्या सर्व पदांचा त्याग केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दुबेंनी जुलै २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आनंद दुबे यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचे चित्र आहे. दुबेंच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना शिवसेना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button