…अन् जलेबी-फापडा भी आपडो!, आशिष शेलारांची शिवसेनेवर मिस्कील टीका

Ashish Shelar-uddhav thackeray

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Elections) बिगुल वाजले असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या १५ जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र कोकणातील सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले आहेत. हा निकाल बघून भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) मिस्कील टीका केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा आता बोलबाला सुरू झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी त्याचे निकाल हाती येत आहे. कोकणामध्ये भाजपाचे एकूण 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्यावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. शेलार यांनी ट्वीट करत त्यांचे 182 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने आनंद व्यक्त करत विरोधकांना टोला देखील हाणला आहे.

‘सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजूनही काही जागांचे निकाल हाती येण्याचे बाकी आहे. त्यामुळे कोकण म्हणजे आम्हीच अशा अहंकारी पक्षाचे वस्त्रहरण सुरू झाले असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्षाचं नाव टाळत त्यांना टोला लगावला आहे. आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!’ असं म्हणतं आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER