सांगली : पलूस मध्ये साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

internationally acclaimed cricket ground in Palos Sangli

सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील पलूस येथील भारती विद्यापीठाच्या आवारात मोठ्या क्रिकेट मैदानाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाची उभारणी केली जात आहे.त्यामुळे पलूससारख्या ग्रामीण भागातील युवकांना सरावासाठी मोठी संधी मिळणार आहे.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना राष्ट्रीय क्रिकेट सामने व आयपीयल सामने पुणे, मुंबई, नागपूरला जाऊन पहावे लागत होते. काही दिवसांतच ती सुविधा पलूस मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री कदम हे प्रयत्नशील आहेत . ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला हवीत, यासाठी कदम यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.

पुणे, मुंबई, नागपूर शहरारानंतर महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय मैदान नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आधुनिक व दर्जेदार अशा सोयी-सुविधा असलेले पहिलेच क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होत आहे. मैदानाचे काम जलदगतीने सुरू आहे. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी लागणारी, अ दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात येत आहे . मैदानावर डे-नाईट क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टया तयार करण्यात येत आहेत. सरावासाठी तीन स्वतंत्र खेळपट्ट्या तयार करण्यात येत आहे.