माजी सरन्यायाधीशांविरुद्धच्या कारस्थानाची चौकशी गुंडळाली

Supreme Court - Ranjan Gogoi
  • सुप्रीम कोर्टाने स्वत: सुरु केलेले प्रकरण बंद केले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) एका महिला कर्मचार्‍याने माजी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामागे एखादे मोठे कारस्थान आहे का, याचा शोध घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी स्वत:च सुरु केलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुंडाळले. न्यायालयाने अशा .संभाव्य कारस्थानाचा पाठपुरावा करण्यासाठी एप्रिल २०१९ मध्ये निवृत्त न्यायाधीश न्या. ए. के. पाठक यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. न्या. पाठक यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या अहवालात अशा कारस्थानाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असे नमूद केलेले असूनही त्याचा अधिक पाठपुरावा न करता हे प्रकरण अशाच अनिश्चिततेच्या अवस्थेत बंद करण्याचे न्यायालयाने ठरविले.

या अहवालात असे कारस्थान असण्याची जी संभाव्य कारणे दिली होती त्यात अनेक प्रकरणांमध्ये न्या. गोगोई यांनी घेतलेली कणखर भूमिका व त्यांनी आसाममध्ये ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबविण्याचा धरलेला आग्रह यांचा समावेश आहे.नऊ महिने थंड्या बस्त्यात ठेवलेले हे प्रकरण गुरुवारी अचानक न्या. संजय कृष्ण कौल, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मणियन यांच्या विशेष खंडपीठापुढे लावण्यात आले.. न्या. पाठक समितीने सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, अहवालात कारस्थानाची शक्यता सूचित केली असली तरी आता दोन वर्षे उलटून गेल्याने त्यासंबंधीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे आता मिळणे कठीण आहे.

न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी काही ‘उपद््व्यापी मंडळीं’नी आपल्या दीड कोटी रुपये देऊ केले होते, असे प्रतिज्ञापत्रही उत्सव बैन्स नावाच्या एका वकिलाने त्यावेळी न्यायालयात केले होते. परंतु रेकॉर्ड व अन्य अनुपूरक साधने उपलब्ध न झाल्याने बैन्स यांच्या या म्हणण्याची पूर्णांशाने शहानिशा करता आली नाही.ठेवण्याात काहीच  हांशिल नाही, असे नमूद करून खंडपीठाने या प्रकरणावर कायमचा पडदा टाकला.नेमलेल्या अंतर्गत चौकशी समितीने काढल़्यानंतर त्या महिला कर्मचाºयास नोकरीतून बडतर्फ केले गेले होते. परंतु तिच्या आरोपामागे काही कारस्थान होते का याचा सोक्षमोक्ष लागण्याआधीच गेल्या जानेवारीत त्या महिला कर्मचार्‍यास पुन्हा नोकरीत घेण्यात आले आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER