वाढदिवसानिमित्त गडकरींकडून रिटर्न गिफ्ट; फक्त बाराशे रुपयात मिळणार ब्लॅक फंगसवरचे इंजेक्शन

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- ब्लॅक फंगसवरील (Mucormycosis) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत बाजारात सात हजार रुपयात मिळणारे हे इंजेक्शन फक्त बाराशे रुपयात मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हे इंजेक्शन लॉन्च केलं आहे. देशात ‘एम्फोटेरिसिन बी इमल्शन’ इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील या इंजेक्शनचे उत्पादन करणार आहे. जेनटेक लाइफ सायन्सची दररोज वीस हजार वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालय हे केंद्राकडून निर्णय येईपर्यंत काळ्या बुरशीच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयातकांद्वारे करार पत्रावर एम्फोटेरिसिन बीवर कररहित आयात करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की, लोकांचा जीव वाचविण्यासाठी काळ्या बुरशीवरील औषधांची गरज आहे.

या औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने आणखी पाच कंपन्यांना या औषधाच्या उत्पादनासाठी परवाना दिला आहे. झायडस कॅडिला (Zydus Cadila) आणि टीएलसी (TLC) या तैवानच्या (Taiwan) औषधनिर्मिती कंपनीने याबाबत दिलासादायक घोषणा केली आहे. Liposomal Amphotericin B हे औषध ब्लॅक फंगस अर्थात म्‍यूकरमायकोसिसच्या (Mucormycosis) उपचारांसाठी वापरले जाते. त्याची भारतात विक्री करण्यासंदर्भातल्या करारावर या दोन्ही कंपन्यांनी स्वाक्षरी केली असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

ही बातमी पण वाचा : ‘अबकी बार नितीन गडकरी पंतप्रधान’, सर्वेक्षणात पुढचे पंतप्रधान म्हणून गडकरींच्या नावाला पसंती

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button