केंद्र सरकार करणार साखर उत्पादकांचे तोंड गोड

साखरेच्या विक्री किंमतीत दोन रुपयांची वाढ ; केंद्रीय मंत्री गटाची शिफारस

Amit Shah

नवी दिल्ली :- ऊस उत्पादकांचे थकीत देणे देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची विक्री किंमतीत प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्यातून ३१ रुपये किलो दराने विक्री जाणारी साखर आता ३३ रुपये किलो दराने विकी जाईल. यामुळे साखर उद्योगाला २० हजार कोटी रुपये जादा मिळणार आहेत.

साखरेच्या किमान विक्री किंमतीत दोन रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटाने बुधवारी घेतला. त्यामुळे साखर कारखान्यांना सुमारे २०हजार कोटी रुपयांची उसाची थकबाकी देण्यासाठी दिलासा मिळणार आहे. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman), अन्नमंत्री रामविलास पासवान, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) उपस्थित असल्याचे सुत्रांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षाच्या सन २०१२-२० मध्ये (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखर कारखानदारांनी आतापर्यंत सुमारे २० हजार कोटी रुपये उसाच्या थकीत उसाच्या थकबाकी आहे. ही थकबाकी भागविण्याबाबत मार्ग काढण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी प्रस्तावांपैकी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविणे हा एक होता. नितीयोगाने साखर विक्री दर वाढविण्याचा प्रस्ताव देण्याची सुचना अन्न मंत्रालयास केली होती. साखरेच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना
थकबाकी कमी करण्यास मदत होईल. यातूनही थकबाकी राहिल्यास केंद्र सरकार इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निती आयोगाने ऊस आणि साखर उद्योगाबाबत गठीत केलेल्या टास्क फोर्सनेही साखर एमएसपीमध्ये साखर विक्री दरात वाढ करण्याची दोन वेळा फिफारस केली होती. गेल्या वर्षी सरकारने किंमतीत दोन रुपये किलोने वाढ करुन ३१ रुपये किलो केली होती. साखरेची किमान विक्री किंमत ही निश्चित मोबदला आणि अत्यंत साखर कारखान्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाची किंमत यावर निश्चित केली जाते. अधिकृत आकडेवारीनुसार साखर कारखान्यांनी सुमारे ७२ हजार कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. २०१९-२० हंगामातील शेतकऱ्यांचे २० हजार कोटी थकबाकी आहे. थकबाकी केंद्राने निश्चित केलेल्या एफआरपी आणि काही राज्यांतील राज्य सल्लागार किंमती (एसएपी) च्या आधारे देय असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER