गेल्या २४ तासात राज्यात ६६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

Coronavirus

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज ६६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज ६१ हजार ४५० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३५ लाख ३० हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.१९ टक्के झाले आहे. राज्यात एकूण ६ लाख ९८ हजार ३५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज एकूण ८३२ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर १.५१ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ६४ हजार ७६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू मागील ४८ तासातील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button