कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासात राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर

Corona Virus

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोका वाढला आहे. पुन्हा कोरोना विषाणू वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळेच आता कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढताना बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण पाहिलं तर आतापर्यंत एकूण 19 लाख 92 हजार 530 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण 95.16 टक्के इतकं आहे. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.46 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 लाख 93 हजार 913 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER