
औंरगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 28 रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1487 झाली आहे. यापैकी 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 69 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 481 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे जुना बाजार (2), मुझफ्फर नगर, हडको (1), व्यंकटेश नगर (1), सुराणा नगर (2), नारळी बाग (2), शिवशंकर कॉलनी (2), हमालवाडी (1), न्यु वस्ती जुनाबाजार (1), भवानी नगर, जुना मोंढा (5), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (1), शिवाजी नगर (1), उस्मानपुरा (4), रेहमानिया कॉलनी (1), रोशन गेट परिसर (2), नारेगाव परिसर (1), न्याय नगर (1) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये 18 पुरूष आणि 10 महिला रुग्णांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला