वाझेच्या अडचणीत वाढ; मिठी नदीत फेकलेला डीव्हीआर, सीपीयू एनआयएला सापडला

DVR - NIA - Sachin Vaze Case

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांसह स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्येप्रकरणी एनआयए जोरदार तपास करत आहे. मनसुख हिरेन मृत्यू आणि उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तेच पुरावे पुन्हा शोधण्याची मोहीम एनआयएतर्फे राबविली जात आहे. वाझेने बीकेसी येथील मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने (NIA) आज या नदीमध्ये शोधमोहीम राबवली. यावेळी अनेक प्रकारचे साहित्य एनआयएच्या हाती लागले आहे.

आज दुपारी एनआयएने बीकेसी येथील मिठी नदीतून संगणकाचे काही सुटे भाग, डीव्हीआर तसेच इतर साहित्य बाहेर काढले आहे. हा मोठा ऐवज हाती लागल्यानंतर आता मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा उलगडा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि मनुसख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सध्या या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत असून रोज नवनवे खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणांशी निगडित असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही या तपासात समोर आले. हेच पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात आता एनआयएच्या हाती काही ठोस गोष्टी लागल्या आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपयुक्त ठरणारे डीव्हीआर, संगणकाचा सीपीयू आणि इतर काही गोष्टी एनआयएच्या हाती लागल्या आहेत. मिठी नदीत ही शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेलाही सोबत आणले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button