मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन पण मित्र पक्ष काँग्रेसनेच केले दुर्लक्ष

an-important-meeting-of-congress-leaders-in-mumbai-today-even-after-uddhav-thackerays-appeal

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाच्या (Corona) संकटाने थैमान घातले आहे . सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सामाजिक, राजकीय, धार्मिकसह सर्व कार्यक्रम रद्द करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . मात्र काँग्रेस पक्षाने नियोजित बैठक रद्द न करता मुंबईत आयोजन केले आहे. त्यामुळे सरकारमधील मित्र पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आवाहान प्रतिसाद देत नाहीत हे उघड होत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवड मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता महिला विकास महामंडळ सभागृह, नरिमन पाईंट येथे होणार आहे. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते. विशेष म्हणजे, विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष यांनी देखील त्यांच्या राजकीय बैठका आणि आंदोलन रद्द केले. मात्र, शिवसेनेचा महाविकास आघाडीत मात्र मित्रपक्ष काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला दुर्लक्ष केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER