उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये अनेक मुद्द्यांवर तासभर चर्चा

sharad pawar - uddhav thackeray - Ajit pawar - Maharashtra Today

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Rservation) आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ही भेट होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांत्याच जवळपास तासभर खलबतं झाली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, जीएसटी आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवर पुढील पावलांबद्दल चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उद्या मुद्द्यांवर भर द्यायचा, आरक्षणासाठी केंद्रानं काय पाऊल टाकणं गरजेचं आहे, केंद्रासोबत याबाबत पुढे ही चर्चा कशी वाढवत न्यायची, या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button