कोल्हापुरात पंतप्रधान मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शन

Chandra Kant Patil

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर वृक्षारोपण अन्नदान आदी उपक्रमांतून कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी (PM Marendra Modi) यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांचा जीवनपट सांगणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे मोदी यांचा जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.भाजपा कोल्हापूर तर्फे कोरोना काळात करण्यात आलेल्या सेवा कार्यासंबंधी ई-पुस्तिकेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

यावेळी आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा ७० वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात सामाजिक उपक्रम राबवत साजरा होत आहे. मोदीजी देशाचे चांगले पंतप्रधान आहेतच पण व्यक्तिगत जीवनात त्यांनी सेवेला फार महत्व दिले आहे म्हणूनच त्यांचा वाढदिवस आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत.

चंद्रकांतदादा पाटील यांनी मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सेवा कार्याबद्दल एक उदाहरण सांगताना म्हणाले कि, मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि आत्ता देखील त्यांना मिळणाऱ्या भेटवस्तू यांचा संग्रह त्यांच्या टीम कडून केला जातो आणि त्या वस्तूंचा दर तीन महीन्यांनी लिलाव करून या मधून मिळणारी रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केली जाते. या प्रदर्शनीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे विविध पैलू अधिक अधिक लोकांसमोर आणण्यात येत आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER