‘एक तर महामारी, त्यावर पंतप्रधान अहंकारी’; राहुल गांधींचे टीकास्त्र

Rahul Gandhi-PM Modi

नवी दिल्ली :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजवले आहे. यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर (Modi Govt) सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला आहे. “केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचे माहीत असताना लसीकरण मोहीम सुरू केली. केंद्राकडे कोणतेही नियोजन नव्हते. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आले.” असे जाधव यांनी म्हटले होते.

ट्विटवरून हल्ला सुरूच
दरम्यान, राहुल यांची केंद्रावर टीका सुरूच आहे. केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहेत. यापूर्वीही त्यांनी ‘पीएम केअर्स फंड’ आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरले, असे म्हटले होते. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी ‘पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल’ आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावे लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button