तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही..; ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूनंतर आनंद महिंद्रांनी केली भावुक पोस्ट

Anand Mahindra

मुंबई :- देशात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या संकटमय काळात सकारात्मकपणे कसे जगायचे हे सांगणारा एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. 30 वर्षीय तरुणीने लव्ह यु जिंदगी म्हटलं खरं पण तिचा लढा अर्धवटच राहिला आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणीच्या मृत्यूवर महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही शोक व्यक्त केला.

आनंद महिंद्रा यांनी त्यासाठी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कोरोना व्हायरस किती क्रूर आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. तिने आपल्याला आयुष्यावर प्रेम करणं शिकवलं…’ असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा व्हिडिओ डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामध्ये, तोंडाला ऑक्सिजन लावून बेडवर लव्ह यू जिंदगी… हे गाणं ही तरुणी ऐकत होती, हे गाणं ऐकताना डान्सही करताना व्हिडिओत दिसत होती .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button