विजयस्तंभ परिसरातील जागा राज्य सरकारच्या ताब्यात यावी म्हणून प्रभावी न्यायालयीन लढाई लढणार- डॉ. राऊत

nitin Raut

पुणे : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज (दि.१ जानेवारी) शुक्रवारी सकाळी ६ वाजता भीमा कोरेगाव येथील ‘विजय स्तंभा’ला मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बु., तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले.

विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत पुणे दौऱ्यावर आले होते. नियोजित वेळेनुसार ठीक ६ वाजता त्यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना दिली. या प्रसंगी त्यांना नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.

“भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेले दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला त्यामागील समाजकारणांना साजेसे दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे. ” असे मत त्यांनी नोंदवले.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करील. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी आणि राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे आणि दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन त्यांनी या वेळेस भीमा कोरेगाव येथे दिले.

हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना
सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाडांच्या निवासस्थानी सकाळी ७ च्या सुमारास भेटीला जात असताना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांना लाईट असूनही पुरेसा प्रकाश जाणवला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी संभाजी महाराज समाधी आणि गायकवाड समाधी परिसर रात्रीही प्रकाशाने उजळून निघावा म्हणून तत्काळ हायमास्ट लाईट लावण्याच्या सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER