…त्याच शरद पवारांच्या घरात टोकाची भांडणं सुरू झाली : शरद पवार

Sharad Pawar - Gopichand Padlkar - Maharastra Today

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. १७ एप्रिलला याठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padlkar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला .

पडळकर म्हणाले की, ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो. मेंढ्याचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसते. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळे गरीब तोंडाचा गृहमंत्री बघतात. त्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था आहे असा टोला त्यांनी लगावला. तसेच राष्ट्रवादीने गोरगरिब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला अशा शब्दात त्यांनी आरोप केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button