राज ठाकरेंचे एक आवाहन आणि कोरोना रूग्णांसाठी मदतीचा महापूर…

Maharashtra Today

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचे(Corona) संकट विक्राळ रुप धारण करत आहे. कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने राज्य सरकारतर्फे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारी यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ठिकठिकाणी कोविड रुग्णालये उभारले जात आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांना हव्या त्या अत्यावश्यक सुविधा देण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मनसेच्या नेत्यांपासून तर खालच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

कल्याणच्या ग्रामीण भागातील कोव्हीड उपचार केंद्राला पक्षाचे नेते-आमदार राजू पाटील यांनी जलशुद्धीकरण यंत्र, वायू शीतक पंखे, शीत कपाटं, कचराकुंडी, बायोमेडिकल बकेट संच, अ‍ॅग्रोस स्प्रे पंप, पंप स्प्रे बॉटल, एमएस कपबोर्ड, मॉप अशा सर्व आवश्यक वस्तूंची मदत केली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक शाखेने डॉ. प्रदीप पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त जलवितरण यंत्र, व्हीलचेअर आणि पंखे नाशिक महापालिकेच्या कोव्हीड उपचार केंद्राला भेट दिले. बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील १०० गरजू व निराधार कुटुंबांना मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस व सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी किराणा व जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं आहे.
कुठलीही सरकारी मदत न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिळत असलेल्या मदतीमुळे रूग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button