भाजपात प्रवेश करणाऱ्या तृणमूलच्या माजी आमदाराचा माफीनामा, ममताना केली विंनती …

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत(BJP) प्रवेश केला. बंगालमध्ये आत पुन्हा ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) यांची सत्ता आली, त्यामुळे भाजपात प्रवेश करणाऱ्या अनेक नेत्यांची आता पंचाईत झाली आहे. अशांपैकी एक, तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदार सोनाली गुहा(Sonali Guha) यांनी मंतांकडे माफीनामा सादर करून ‘मला पुन्हा पक्षात घ्या’ अशी विंनती केली आहे.

सोनाली गुहा या चार वेळा तृणमूलकडून आमदार होत्या. ममता बॅनर्जींच्या वर्तुळातील, अशी त्यांची ओळख होती. पक्षाने त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले नाही. पक्षाबद्दल माध्यमांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाकडून त्यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेन, असे सांगितले होते. त्यांनी आता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी पत्रकारांना सांगितले की, माझा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय चूक होता ही जाणीव मला होते आहे. तिथे मला नेहमी वेगळे असल्याची जाणीव झाली. त्यांनी माझा वापर केला. मला ममतांची बदनामी करण्यास सांगितले, पण मी असे केले नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन.
ममताना लिहिले पत्र

दुभंगलेल्या मनाने मी हे पत्र लिहित असून, भावनिक होऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. आपण मला माफ केलं नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेन. दीदी, ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याप्रमाणे मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही,

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button