एका आफ्रीकी सेनापतीनं रोमन साम्राज्यात घुसून केला होता पराभव!

Maharashtra Today

अनेक हत्तींसह लढाईला निघणारा असा सेनापती ज्यानं हिम पर्वत ओलांडून रणभूमी गाठली. हजारो किलोमीटरचा प्रवास करत त्यानं हे शक्य केलं. ऐकायला अशक्य वाटत असलं तरी कर्थोजचा महान योद्धा आणि सेनापती ‘हॅनिबल बरका; (Hannibal Barca) यानं हे करुन दाखवलं.

हॅनिबल बरकाची आज ही जगभर ओळख सर्वात पराक्रमी सेनापती अशी आहे. त्यानं रणभूमीत पाय ठेवला की फक्त विजय हीच एकमेव शक्यता शिल्लक रहायची. त्याच्या पराक्रमाच्या अनेक कथा इतिहास आजही अभिमानाने मिरवतो आहे. ७० हजार रोमन सैनिकांना त्यानं मृत्यूच्या दर्यात फेकलं होतं. हॅनिबल हातावर शिर घेऊन लढायचा. त्याचा पराक्रम आणि शौर्याची दहशत जगातल्या सर्वात शक्तीशाली मानल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्यालही वाटायची.

वडीलांनी दिली होती शपथ

हॅनिबल बरकाचा जन्म इसवी सन पूर्व २४७ला आफ्रिकेच्या कर्थोजमध्ये झाला. त्याचे वडील हॅम्लिकर बरका कार्थागिनीनचे महान सेनापती होते. त्यांनी अनेक रणभूमि गाजवल्या पण प्युनिकच्या पहिल्या युद्धात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रोमन साम्राज्याकडून बदला घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या राज्याचा विस्तार सुरु केला. हॅनिबलचे वडील लढाईसाठी स्पेनकडे रवाना होत होते. हॅनिबलनं सोबत येण्याची इच्छा त्यांना बोलून दाखवली. तेव्हा त्यांचा वडीलांनी उकळत्या पाण्यात हॅनिबलचा हात बुडवूण त्याला शपथ घ्यायला लावली, ”रोमन साम्राज्याशी कधी मैत्री करायची नाही.” हॅनिबलनं पित्याला दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळलं. त्यांनी स्पेन जिंकल. हॅनिबल अठरा वर्षाचा झाला होता. इसवी सन पुर्व २२९ ला त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला.

हॅनिबलनं राज्याला अधिक शक्तिशाल बनवावं हीच त्याच्या वडीलांची शेवटची इच्छा होती. हॅम्लियरच्या मृत्यूनंतर त्यांचा जावाई हसडुबलनं शासन हातात घेतलं पण ८ वर्षांनंतर त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर सैन्यानं संगनमत करत हॅनिबलची नियुक्ती सेनापती पदी केली.

दुसऱ्या प्युनिय युद्धाला सुरुवात

२६ वर्षीय हॅनिबलनं वडिलांची आक्रमक रणनिती जवळून पाहिली होती. वडिलांच्याच पद्धती वापरुन तो राज्यविस्तार करु लागला. स्पेनच्या अधिपत्याखालील मोठ्या भूखंडावर हॅनिबलनं ताबा मिळवला. सैन्याला सोबत घेऊन हॅनिबल एकानंतर एक प्रदेश जिंकत होते. मोठा राज्यविस्तार होत होता. हॅनिबलचा वाढता प्रभवा रोमन साम्राज्याच्या डोळ्यात खुपायला लागला. त्यांनी एब्रो नदिच्या दक्षिणेला सगुंटम शहरावर हल्ला केला. हॅनिबलच्या वडिलांनी रोमनांशी केलेल्या काराराचं ते उल्लंघन होतं.

तब्बल आठ महिने वेढा दिल्यानंतर हॅनिबलनं हा प्रदेश पुन्हा जिंकला. यातच हॅनिबलला रोमनांशी युद्ध करायची संधी मिळाली. वडिलांच्या मृत्यूचा त्याला बदला घ्यायचा होता. त्यानं रोमन दरबारी दुतद्वारे युद्धाचं आव्हानं दिलं. इतिहासात हे युद्ध ‘दुसरं प्युनिक युद्ध’ म्हणून प्रसिद्ध आहे.

युद्धासाठी ओलांडले हिमपर्वत

युद्धासाठी हॅनिबलनं मोठी सैन्य भर्ती केली. आल्प्स रस्ता त्यानं युद्धासाठी निवडला. हा मार्ग अनेक हिम पर्वतातून निघून रोमन क्षेत्रापर्यंत पोहचायचा. रोमन सम्राटाला वाटलही नव्हतं की इतक्या अशक्य कोटीच्या मार्गाचा वापर करुन हॅनिबल रोमनवर चाल करेल. ३८ हजार पायदळ सैन्य, ८ हजारांच घोडदळ आणि ३७ हत्ती घेवून हॅनिबल रोमन जिंकायला निघाला. ३ हजार किलोमीट लांबीचा मार्ग हिम पर्वत, हजारो फुट उंची, जिवाची भिती. या सर्व प्रतिकुल परिस्थीतीवर मात करुन तिथवर पोहचणं अशक्य कोटीच बनत चाललं होतं. पण हॅनिबलचं जोशपुर्ण भाषण आणि कर्थोजच्या सैन्याच्या प्रोत्साहनामुळं सैन्यानं अशक्य ते शक्य करण्याचा निर्णय घेतला होता.

जीवघेणी थंडी आणि पहाडी रस्ता यातून वाट काढणाऱ्या हॅनिबलच्या सैन्याला मोठ्या दुविधेचा सामना करावा लागला. सर्व प्रतिकुल परिस्थतीवर मात करत सैन्य रोमन क्षेत्रात दाखल झालं.

हजारो रोमन सैनिकांचा घेतला जीव

प्रतिकुल रस्ता ओलांडून हॅनिबल रोमन क्षेत्रावर पोहचला पण त्याचे हजारो सैनिक वाटतेच थंडीमुळं मारले गेले होते. जे उरले होते ते थकले होते. पण विजयाशिवाय त्यांच्याकडं पर्याय नव्हता. हॅनिबलनं एकापाठोपाठ एक प्रदेश जिंकायला सुरुवात केली. स्थानिक विद्रोही सैन्य गटांनी हॅनिबलला साथ दिली. रोमन सैन्यानं त्यांच्यावर आक्रमण केलं पण ते असफल झाले. अनेक सैनिक मरणाच्या दाढेत फेकले गेले. या युद्धात हॅनिबलनं गमिनी काव्याचा वापर केला. इसवी सन पुर्व २१६ पर्यंत रोमन साम्राज्याचा मोठा हिस्सा हॅनिबलनं जिंकला होता. रोमन साम्राज्यानं त्याच्या विरुद्ध छोट्या मोठ्या मोहिमा उघडल्या होत्या. रोमनांनी सैन्य पाठवलं की ते परत यायचं नाही हॅनिबल त्यांच्या तुकडीचा खात्मा करायचा.

शेवटी त्यांनी हॅनिबलवर मोठं सैन्य पाठवलं. रोमन सैन्याच्या महाकाय तुकडीनं हॅनिबलवर आक्रमण केलं. हॅनिबलनं गनिमीकाव्याचा वापर केला. याच रणनितीला वापरुन रोमन सैन्याचा मानहानीकारक पराभव केला. रोमनांचं ७० हजार सैन्य हॅनिबलच्या नेतृत्वात त्याच्या सैन्यानं अक्षरशः कापून काढलं अशा ऐतहासिक नोंदी आहेत. तर दुसऱ्या बाजूला हॅनिबलला ६ हजार सैन्याला गमवावं लागलं.

‘जम युद्ध’ आणि हॅनिबलचा मृत्यू

या विजयानंतर हॅनिबलच्या अधिपत्याखाली मोठा प्रदेश आला. हॅनिबलच सैन्य थकलं होतं त्यानं कार्थोजला परतायचा निर्णय घेतला. जगात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचा घरात घुसुन हॅनिबलनं पराभव केला.

यानंतर तिसऱ्या पुन्यिक लढाईला सुरुवात झाली. या युद्धाला ‘जम युद्ध’ म्हणूनही ओळखलं जातं. या युद्धात हॅनिबलनं पराक्रमाची शर्थ केली पण त्याचा पराभव झाला. हॅनिबलच्या पराभवानंतर त्याच्या सहयोगी राष्ट्रांनी उठाव केला. हॅनिबलवर रोमनांपुढं शरणागती घेऊनच जिवंत राहण्याचा मार्ग होता. त्यानं विष पिऊन आयुष्य संपवलं तो शरण गेला नाही. त्याच्या मृत्यूनंतर कार्थोज राज्याला रोमनांनी जाळून टाकलं. पण कार्थोजच्या आगीच्या त्या ठिणग्या आजही हॅनिबलच्या पराक्रमाची गाथा सांगतात.

ही बातमी पण वाचा : अजिंक्य नेपोलियनच्या पराभवाचं कारणं एक ज्वालामुखी होता का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button