पंतप्रधान मोदींशी लढण्यासाठी राहुल यांना शरद पवारांचा सल्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरीने लढण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनि सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसावे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर आता काँग्रेसने ही प्रतिउत्तर दिले आहे. काँग्रेसने यावर म्हटले आहे की,’ हा शरद पवार यांचा व्ययक्तिक दृष्ट्टीकोन आहे.

शरद पवार यांनी माध्यमांना दिलेल्या विधानात म्हटले की,’ राहुल यांच लक्ष येणाऱ्या राजकीय पर्यायाच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी याना आव्हान देण्यावर आहे.त्यामुळं राहुल यांना आपल्या पद्धतीत बदल करावे लागणार. तसेच आपल्या कामात सातत्य ठेवावे लागणार.

काँग्रेस प्रवक्ता आनंद शर्मा यांना पवारांनी केलेल्या या विधानावर विचारले असता ते म्हणाले,’ मी शरद पवार यांचा सन्मान करतो. तो त्यांचा दृष्टीकोन आहे. मी कोणाच्या दृष्टीकोनावर काहीही विधान करू शकत नाही. पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वरून राहुल गांधींवर केलेल्या पवारांच्या विधानाला सूचित करून म्हटले,राजकीय नेते एक – दुसर्यांसारखे नसू शकतात.

काँग्रेसच्या होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, संघटन मध्ये बदल होत असतात आणि पुढे ही होत राहणार. याविषयी जे ही निर्णय घेण्यात येतात त्याची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात येते.

दरम्यान,’ यावर्षीच्या शेवटी गुजरात मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलताना सोमवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात ‘ कार्यक्रमावर टीकास्त्र सोडत म्हटले की,’ जर काँग्रेस निवडणूक जिंकली तर आमची सरकार एका व्यक्तीसाठी नव्हे तर सर्वांसाठी असणार. पुढे त्यांनी मोदींना टोला मारत म्हटले स्वतःची ‘ मन की बात’ सांगण्यापेक्षा आमची सरकार जनतेची ‘ मन की बात’ ऐकणार.