ॲमी जॅक्सन टॉपलेस फोटो मुळे सापडणार वादात!

Amy Jacson

बॉलीवूड मधील अभिनेत्री सेक्सी आणि मादक फोटोसेशन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेकदा नायिकांनी टॉपलेस फोटो (Topless Photo) सेशन करून खळबळ माजवली होती. नायिकांच्या टॉपलेस फोटो वरून खूप वादही निर्माण झाले होते मात्र यापासून काहीही धडा नायिकांनी घेतलेला दिसत नाही. अभिनेत्री ॲमी जॅक्सनने (Amy Jackson) नुकतेच एक टॉपलेस फोटोसेशन केले. एवढेच नव्हे तर तिने यापैकी काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेरही केले. या फोटोवरून एकीकडे तीत ट्रोल होत असतानाच, तिच्या प्रशंसकानी मोठ्या प्रमाणावर फोटो लाईकही केला. मात्र या फोटोमुळे ती ती अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या वाढदिवसानिमित्त बीचवर विवस्त्र अवस्थेत धावताना दिसला होता. त्याचा तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र या फोटोमुळे तो अडचणीत आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲमी जॅक्सन अंग प्रदर्शनासाठी फेमस आहे. तिच्या चित्रपटांमध्ये तिने अंगप्रदर्शन करून ही कोणत्या स्तराला जाऊ शकते हे दाखवून दिले होते. ॲमीने नुकतेच एक अत्यंत बोल्ड असे फोटोशूट केले. या फोटोमध्ये तिने बोल्ड अवतार दाखवला आहे. खरेतर यापूर्वीही ही ॲमीने सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले होते, परंतु या वेळेचे फोटो हे त्या फोटोपेक्षा एक पाऊल पुढे असलेले आहेत. ॲमीचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून शेअरही केला जात आहे. तिच्या या टॉपलेस फोटोला चार लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. ॲमीने गेल्यावर्षी एका मुलाला जन्म दिला असून ती मुलाचे फोटो ही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करीत असते. तिचे मुलाबरोबरचे फोटोही चांगलेच व्हायरल होत असतात. मात्र हा टॉपलेस फोटो तिला वादात अडकवू शकतो असे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER