पंतप्रधान मोदींना अमूलकडून अनोख्या शुभेच्छा

Amul

मुंबई : भारताचे लाडके व्यक्तिमत्त्व  म्हणून देशभरात नावलौकिक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. देशातील कानाकोपऱ्यातून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा येत आहेत. अमूल या भारतातील एका अग्रगण्य दुग्ध उत्पादक संस्थेने त्यांच्या नेहमीच्या अनोख्या अंदाजात पंतप्रधानांना एका व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये आतापर्यंत त्यांनी देशासाठी केलेली विकासकामे आणि ‘अमूल’ च्या उत्पादनांचा उल्लेख करत करत गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान इथपर्यंतचा मोदींचा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. मग त्यामध्ये मोदींनी मिळवलेले बहुमताचे सरकार, स्वच्छ  भारत अभियान, स्टार्टअप इंडिया, पंतप्रधान मोदींचे देशविदेशातील दौऱ्यांमुळे भारताचे अन्य देशांबरोबर वृद्धिंगत झालेले संबंध या सगळ्या गोष्टींचे वर्णन या व्हिडीओमध्ये करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER