‘मलंग’मधील भूमिकेसाठी अमृताने घटवलं वजन

Amrita Khanwilkar

मुंबई : गाजलेल्या “राझी” चित्रपटातून अवघ्या हिंदी चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलेली अभिनेत्री अमृता खानविलकर आता “मलंग” या बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित “मलंग” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अभिनेता अनिल कपूर यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांचीही एक झलक या ट्रेलर मध्ये आहे.

“मलंग” हा नव्या वर्षातला बहुचर्चित चित्रपट असून अमृतासाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल १२ किलो वजन कमी केलं आहे.

चित्रपटाचा ट्रेलर अतिशय लक्षवेधी आहे. आता या चित्रपटात अमृताच्या वाट्याला काय भूमिका आली आहे, हे लवकरच कळेल. अमृता तिच्या नेहमीच्या शैलीत या चित्रपटात नक्कीच भाव खाऊन जाईल यात शंका नाही.