रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही; पतीनंतर पत्नी अमृता यांचाही आदित्य ठाकरेंवर पलटवार

Amrita Fadnavis-Aditya Thackeray

मुंबई : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून केलेले बांगड्यांचे विधान चांगलेच गाजत आहे. देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात आता मिसेस फडणवीसांनीही उडी घेतली आहे. रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

‘रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो.’ अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटला कोट करत दिलं आहे. आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्यांनी टॅग केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उद्देशून बांगड्यांवरून केलेल्या वक्तव्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सहसा मी प्रत्युत्तर देत नाही पण.., माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी ही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे