‘त्यावेळी प्रमाणपत्राची आवश्यकता असते !’ अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Amruta Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :  राज्य सरकारने आज अनलॉक-५ अंतर्गत नवी नियमावली जारी केली आहे. ग्रंथालय, मुंबईतील मेट्रोसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र देवालय उघडण्याबाबत कुठलाही आदेश देण्यात आला नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं आहे.

मंगळवारी रात्री अमृता फडणवीस यांनी ट्विट करत सरकारला लक्ष्य केलं. ‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. आता यावर शिवसेना नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER