अमृता सिंह, छे छे ही तर सारा

Sara-Akshay Kumar

सोबतचा फोटो पाहिला तर त्यात अक्षयकुमारसोबत अमृता सिंह ( Amrita Singh)असल्याचे जाणवते. अमृता सिंह जेव्हा ऐन बहरात होती तेव्हा तिने अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मोठ्या नायकांची नायिका म्हणून काम केले होते. मात्र सैफबरोबर लग्न झाल्यानंतर तिने चित्रपटात काम करणे सोडले होते. मात्र कधी तरी ती एखाद्या चित्रपटात दिसते. आज अमृताची आठवण येण्याचे कारण म्हणजे हा फोटो.

या फोटोमध्ये अक्षयकुमार (Akshay Kumar) आणि सारा (Sara)आहेत. पण पहिल्यांदाच पाहाताना असे वाटते की, अक्षयकुमार अमृतासोबतच आहे. स्वतः अक्षयनेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर हातातील चित्रपटांचे काम वायुवेगाने पूर्ण करण्याकडे अक्षयने लक्ष दिले आहे, गेल्या दोन महिन्यात त्याने काही चित्रपट आणि जाहिरातींचे शूटिंग सुरु केले आहे. त्याच्या काही चित्रपटांमध्ये ‘अतरंगी रे’ चित्रपटाचाही समावेश आहे. भूषण कुमार द्वारा निर्मित, आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाचे लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी म्हणजे मार्चमध्ये वाराणसीत शूटिंग सुरु होते. पण लॉकडाऊनमुळे 20 मार्चला शूटिंग बंद पडले होते ते आता पुन्हा सुरु करण्यात आले आहे. एआर रहमान चित्रपटाला संगीत देत असून कथा हिमांशु शर्माची आहे. अक्षयकुमार, धनुष आणि सारा अली खान अभिनीत या चित्रपटाचेही अक्षयने शूटिंग सुरु केले असून सोबतचा फोटो हा त्या चित्रपटाच्या सेटवरचाच आहे. फोटोत सारा अली खान आणि अक्षय कुमार खूपच आनंदी दिसत आहेत.

सफेद रंगाचा कुर्ता घातलेली सारा अली खान सफेद रंगाचा कुर्ता घातला असून वर पिवळ्या रंगाची ओढणी घेतेलेली आहे. फोटोसोबत अक्षयकुमारने ‘लाइट्स, कॅमरा, अॅक्शन. हे तीन शब्द ऐकल्यावर जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. आनंद एल रायच्या ‘अतरंगी रे’ चे शूटिंग सुरु केले आहे. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांची आवश्यकता आहे अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER