अमृता रावने मुलाचे नाव ठेवले वीर

Amrita Rao

प्रख्यात अभिनेत्री अमृता रावने (Amrita Rao) एक नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर अमृतावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अमृताने सोशल मीडियावर आई झाल्याची माहिती देत प्रशंसकांना मुलाचे नाव काय ठेवावे असा प्रश्नही केला होता. यावर प्रशंसकांनी अनेक नावे तिला सुचवलीही होती. त्यामुळे अमृता मुलाचे नाव काय ठेवते आणि मुलाचा पहिला फोटो कधी शेअर करते याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

15 मे 2016 ला अमृता राव आणि आरजे अनमोलने लग्न केले होते. जवळ जवळ चार वर्षानंतर त्यांच्या संसारात पूल उमलले आहे. खरे तर अमृताने गरोदरपणाची बातमी लपवून ठेवली होती. शेवटच्या महिन्यात तिने गरोदरपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे तिचे प्रशंसक नाराजही झाले होते. त्यामुळे पुन्हा प्रशंसकांना नाराज करायचे नाही हे तिने ठरवले आणि प्रशंसकांची नावाची आणि चेहरा पाहाण्याची इच्छा पाहून अखेर अमृता आणि तिचा पति अनमोलने सोशल मीडियावर तिघांचा एक फोटो शेअर केला आहे. परंतु या फोटोत त्यांनी मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. तिघांचेही फक्त हात दिसत आहेत. अनमोलने हा फोटो शेअर केला असून अमृताने तो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रिपोस्ट केलेला आहे. फोटोसोबतच या दोघांनी मुलाच्या नावाची घोषणाही केली आहे. फोटोसोबत अनमोलने लिहिले आहे, जगाला हॅलो, भेटा आमचा मुलगा वीरला. तो तुमच्यासोबत त्याच्या पहिल्या BroFist लुकमध्ये आहे. त्याच्यावर तुमचा आशिर्वाद कायम असू दे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER