अमृता फडणवीस यांना जागतिक शांतिदूत सन्मान बहाल

Amruta Fadanvis

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जागतिक शांतिदूत सन्मान बहाल करण्यात आला. वर्ल्ड पीसकीपर्स चळवळीचे संस्थापक डॉ. सर ह्यूज यांच्या हस्ते अमृता यांना हा सन्मान देण्यात आला.

त्या मिसेस मुख्यमंत्री असल्या तरी सामाजिक क्षेत्रातही त्यांचे नाव आहे.


त्या सध्या जलसंधारण उपक्रमांवर काम करत आहेत. सर डॉ. ह्यूज यांनी जागतिक शांतिदूत म्हणून अमृता यांचा सत्कार केला आहे. The World Peacekeepers Movement (TWPM) ही एक ऑनलाईन चळवळ आहे.

फेसबुकच्या माध्यमातून यात जगभरातील दोन  लाखांहून जास्त सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. ही चळवळ कृतज्ञता, क्षमा, प्रेम, नम्रता, देणे, धैर्य आणि सत्य अशा सात  शांतिमूल्यांवर आधारित आहे.