अमरावती शिक्षक मतदारसंघ : अपक्ष किरण सरनाईक यांची आघाडी कायम

Kiran Saranaik

अमरावती : अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर ९६६ मतांनी आघाडीवर आहेत, त्यांना ६०८८ मतं मिळाली आहेत. विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५१२२ मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शेखर भोयर (अपक्ष) तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना २८११ मतं मिळाली आहेत.

दोन फेरींच्या मोजणीत एकूण ३०९१८ मटणाची मोजणी झाली असून २९८२९ वैध व १०८९ मतं अवैध ठरली. सरनाईक यांना दुसऱ्या फेरीत २९५८ आणि महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना २८२२ व अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना २८११ मतं मिळाली आहेत. (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result)

पहिल्या फेरीचा निकाल

पहिल्या फेरीत १३९९९ मतांपैकी ४८८ अवैध, १३५११मते वैध ठरली. या फेरीतील मते – डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश काळबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER