दीपाली चव्हाण प्रकरणी नवनीत राणा आक्रमक ; केली ‘ही’ मोठी मागणी

Maharashtra Today

मुंबई : दीपाली चव्हाण आत्महत्या (Deepali chavan) प्रकरणात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे . या प्रकरणात निलंबित झालेल्या DFO विनोद शिवकुमार याला अटक केल्यानंतर आता अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल करावे आणि निलंबित करावे, अशी मागणी अमरावती जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी केली आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या आता राजकीय आखाडा तापू लागला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडली आहे. नवनीत राणा यांनी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्याकडे एक तक्रार केली आहे.

‘आपण स्वतः दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डी यांच्याकडे 10 वेळा फोन केले आणि रवी राणा यांनी सुद्धा रेड्डी तसेच वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा रेड्डी यांच्याकडे मागणी केली असताना रेड्डी यांनी सातत्याने डी एफ ओ शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न केले त्यामुळे रेड्डी सुद्धा शिवकुमार एवढेच दोषी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

येत्या चार दिवसांत रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास आपण स्वतः राज्यपाल व संसदेत हा मुद्दा लावून धरू, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER