जरा घराबाहेर पडा आणि… ; नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Navneet Rana-CM Thackeray

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला . मेळघाटातील (Melghat) आदिवासींना वीस-वीस वर्षे जुन्या बसगाडय़ा दिल्या जातात, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दोघे शुक्रवारी मेळघाटच्या दौऱ्यावर होते. परतीच्या वेळी धारणी ते परतवाडा बसने प्रवास करून प्रवाशांच्या समस्यांचा एक व्हिडीओ शेअर केला. यातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले .

राज्यातील काही भागात नवीन बसेस दिल्या जातात. मुंबईत तर वातानुकूलित बसेस धावत आहेत. पण, मेळघाटात मात्र वीस-वीस वष्रे जुन्या बसमधून आदिवासींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. धारणीहून अमरावतीला बसने यायला पाच तास लागतात. अनेक बसेसची दारे तुटलेली, खिडक्यांना काच नाही, खडखड आवाज करीत अत्यंत धिम्या गतीने एसटीचा प्रवास सुरू आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. परिवहन मंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला अजूनही वेळ मिळालेला नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

दरम्यान व्हिडीओ काढताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे धावत्या बसचे दार उघडे ठेवून बोलत होते. बससोबतच धावणाऱ्या दुचाकीवरून व्हिडीओचे चित्रिकरण करण्यात आले. हे सर्व धोकादायक आहे. याशिवाय त्यांनी बसमधून प्रवास करताना मास्क देखील घातला नाही .

ही बातमी पण वाचा : मातोश्री पुरमुक्त राहण्यामागचे रहस्य; मुंबईभर राबवणार तो फॉर्म्युला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER